अजून गाती तुझीच गाणी दग्ध परांचे पक्षी
अजून उठते स्मृतीपटलावर तुझीच सुंदर नक्षी
अजून आतील पार्यावरती तुझ्याच प्रतिमालाटा
अजून डोळे शोधत बसती तुझ्याच पाऊलवाटा
अजून वेड्या वार्यावरती तुझाच दरवळ येतो
अजून मनाच्या दारावरती तुझाच पदरव होतो
अजून लावतो पुन्हा उगाचच अर्थ तुझ्या शब्दांचा
अजून घेतो कधी कधी मी शोध तुझ्या गावाचा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment