Wednesday, May 16, 2007

इतिहास

काळ्पुरुषाच्या अभंग पिंडीसमोर बसलाय तो .. दगडी नंदी!

कधी त्याच्याही नाक्पुड्यातून पसरल्ए असतील आगीचे लोळ...
त्याच्याही डोळ्यात पाझरले असेल रक्त...
आता नाहीत ते फुत्कारणारे निश्वास!
आता मत्र त्याचे डोळे अबोध, निर्व्याज, अर्थ्शून्य!

त्याला डावी किंवा उजवी प्र्दक्षिणा घाल्तात लोक
आपलीच दिशा ब्रोबर मानणारे धडकतात
आणि त्यांची डोकीही फुटतात.
पण नंदी कोण्तीच साक्ष देत नाही.
तो नुसता बसून राह्तो अबोध, निर्व्याज, अर्थ्शून्य!

1 comment:

रोहित said...

विसुना, तुमचं लिखाण आवडलं. तुमच्या या अनुदिनीला वारंवार भेट आता नक्की!

 
Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License